वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर दगडफेक

Foto
तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल तर एक अटकेत; दोन फरार

पैठण, (प्रतिनिधी) : वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवावर दगडफेक करून चालकाला बेदम मारहाण करण्याची व वाहनाच्या काचा फोडल्याची घटना बुधवारी दुपारी (गोल नाका) परिसरात घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी तीन व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका जणांना ताब्यात घेतले असून दोघेजण फरार आहेत.

पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी दुपारी गोल नाका येथे वाळू वाहतूक करणारा हायवा जात असताना अरुण रुस्तुम काळे, राहणार वडवाळी तालुका पैठण, राधाकिशन उर्फ बंडू मच्छिंद्र निवारे राहणार जुने कावसन, व शुभम ठाणगे राहणार इंदिरानगर पैठण या तिघांनी शेवगाव ते छत्रपती संभाजी
नगर रोडवर असलेल्या गोल नाका पैठण येथे हायवा अडवून वाहनचालकाला खाली ओढून शिवीगाळ केली व म्हणाले की तू वाळूची वाहतूक करतोस आम्हाला वाळूचा हप्ता पाहिजे अशी धमकी दिली.

 वाहन चालकाने घाबरून वाळूचे वाहतूक करण्यासाठी अरुण रुस्तुमराव काळे यास दहा हजार रुपये हप्ता दिला. यानंतर
इतर आरोपींनी चालकास बेदम मारहाण केली व वाहनाच्या काचा फोडल्या. पोलिसांनी विजय आसाराम गायकवाड राहणार नारायणगाव तालुका पैठण यांच्या फिर्यादीवरून वरील तिघा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका जण ताब्यात घेतले असून दोघेजण फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली.